⭕केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ विषयी प्रख्यात वक्ते सीए सातभाई यांचे व्याख्यान
_नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या पुढाकाराने विनामूल्य वेबिनारचे आयोजन_
नाशिक: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात होऊ घातलेल्या विविध करप्रणाली बाबतच्या तरतुदी, कर कायद्यातील दुरुस्ती, बदल यांचे व्यावहारिक परिणाम समजून घेण्यासाठी नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स, अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स असोसिएशन व मालेगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ विषयी “ऑनलाइन वेबिनार” चे आयोजन करण्यात येत असून या चर्चासत्रात पुणे येथील प्रसिद्ध वक्ते व तज्ञ सीए सातभाई हे विश्लेषण करणार आहेत.
सीए. डॉ.दिलीपजी सातभाई हे आंतरराष्ट्रीय कर कायद्याचे तज्ञ व महाराष्ट्रातील नामवंत वक्ते व लेखक म्हणून ओळखले जातात. या वेबिनारमध्ये ते “अर्थसंकल्प २०२६” मधील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांबाबतच्या तरतुदी, आयकर व जीएसटी मधील बदल, करदात्यांवरील संभाव्य परिणाम याचबरोबर व्यावसायिक व उद्योजकांसाठी असलेल्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
हा वेबिनार “मराठी भाषेत” सर्वाना सहज समजेल अशा रीतीने संपन्न होणार असून, या कार्यक्रमाचा लाभ केवळ चार्टर्ड अकाउंटंट्स, कर सल्लागार व टॅक्स अडव्होकेट्स यांनाच नव्हे, तर राज्यातील विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यापारी, संस्था प्रतिनिधी आणि करदाते यांनाही होणार आहे. त्यामुळे राज्यातील तमाम सीए, कर सल्लागार, कर कायदे तज्ज्ञ तसेच उद्योजकांनी या वेबिनारमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोंगरे, ॲड. सतीश कजवाडकर, किशोर गांधी यांनी केले आहे.
सदरील वेबिनार सोमवार,
दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत पार पडणार असून सर्वांसाठी “पूर्णपणे विनामूल्य”
करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी करण्याकरिता योगेश कातकाडे (जनसंपर्कप्रमुख) ९८८१८४३६१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.