नाशकात शहरात वादीवाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी

नाशकात शहरात वादीवाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी

जॉईन व्हाट्सअप ग्रुप

प्रतिनिधी माधुरी जाधव :/  गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाचे आगमन झालेले होते. तसेच आज दुपारनंतर पावसाने नाशिक शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.

नाशिक शहरात पावसाने दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.

दरम्यान, पावसाने शहरातील सिडको, सातपूर, सीबीएस, शालीमार या परिसरासह आदी भागांत हजेरी लावली. तसेच पावसासोबतच जोरदार वारे असल्याने काही ठिकाणी रस्त्यावर झाडे देखील पडल्याची घटना घडली.

 

Nashik Rain, River, Rain, Nashik, Monsoon Nashik

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *