मुदत ठेव पावती! करमुक्त व्याजासाठी ३० एप्रिलच्या आत ‘फॉर्म १२१’ भरा

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

मुदत ठेव पावती! करमुक्त व्याजासाठी ३० एप्रिलच्या आत ‘फॉर्म १२१’ भरा

प्रतिनिधी:/ १ एप्रिल २०२६ पासून नवीन ‘प्राप्तीकर कायदा २०२५’ लागू झाला. नवीन कायद्याचे स्वरूप अधिक सुलभ असून ते करदात्यांच्या हिताचे असल्याचे म्हटले जात आहे. पूर्वीच्या प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीनुसार बँकेतील मुदत ठेव (एफ डी) पावतीवरील व्याजावर टीडीएस कपात केली जाऊ नये, मिळणाऱ्या व्याजावरती टॅक्स लागू नये याकरिता नागरिकांना फॉर्म १५ जी अथवा १५ एच हा फॉर्म भरावा लागत होता. मात्र, नवीन प्राप्तिकर कायद्यामध्ये बदल करण्यात आला असून १५ जी/१५ एच फॉर्म च्या जागी नवीन ‘फॉर्म १२१’ हा भरावा लागणार आहे.

पुर्वीचा फॉर्म १५ जी हा ६० वर्षाखालील नागरिकांकरिता, तर १५ एच हा ज्येष्ठ नागरिकांकरिता वापरला जात होता. आता मात्र दोन्ही ही करदात्यांसाठी फॉर्म १२१ हा एकच फॉर्म असणार आहे.

फॉर्म १२१ भरण्यापूर्वी त्याच्या अटी व शर्ती तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल (वयवर्ष ६० पेक्षा जास्त असल्यास)

✓ तुमचे एकूण करपात्र उत्पन्न हे शून्य असायला हवे.

नवीन कर स्लॅब नुसार रिबेट वजा जाता १२ लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त आहे.

जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक नसाल (वयवर्ष ६० पेक्षा कमी असल्यास)

✓ तुमचे एकूण करपात्र उत्पन्न हे शून्य असायला हवे.

✓ तुमचे सर्व मुदत ठेवी पावतीवरील व्याजाची रक्कम हि प्राप्तिकर कायद्यातील ‘मूलभूत कर सवलतीच्या’ आत म्हणजेच ‘करमुक्त उत्पन्न मर्यादे’ च्या आत असावी.

“प्राप्तिकर कायदा समजून घेतल्यास करदात्यांना फायदा”

“लहान मोठी सुरक्षित गुंतवणूक व निश्चित उत्पन्नाचा स्रोत म्हणून लोक मुदत ठेव पावती (एफ डी) ला पसंती देतात. मात्र प्राप्तिकर कायद्या बाबत नागरीक फारसे जागरूक नसल्याने व्याज स्वरूपात मिळणाऱ्या उत्पन्नावर बँकेकडून टीडीएस स्वरूपात कर (टॅक्स) कपात केली जाते. यामुळे गुंतवणूकदाराचे एक प्रकारे नुकसान होत असते ते टाळण्यासाठी वेळतच फॉर्म १२१ तुमच्या गरजेनुसार विविध बँक, पोस्ट ऑफिस मध्ये दाखल करणे हिताचे ठरेल”.

योगेश भास्कर कातकाडे (कर सल्लागार, प्रमाणित लेखापरीक्षक)


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *