खुटवड नगरात भीषण अपघात : 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू; डंपरच्या धडकेत अनेक वाहने चिरडली

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील खुटवड नगर परिसर आज दुपारी झालेल्या भीषण अपघाताने हादरला. सुमारे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सिटू भवन व मधुर स्वीटजवळील चौफुलीवर भरधाव वेगाने आलेल्या डंपरने अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून काही जण थोडक्यात बचावले. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मृत तरुणीचे नाव पायल राम गोसावी (वय २३, रा. गुलमोहर कॉलनी, डी.जी.पी. नगर नं. २) असे आहे. पायल या त्यांच्या मोठ्या बहिणीसोबत ॲक्टीव्हा (क्र. MH15 JE 7709) या दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला. चौफुलीवर पोहोचताच दगडाने भरलेला डंपर (क्र. MH04 GC 0988) अतिवेगात येत नियंत्रण सुटल्याने समोरच्या वाहनांवर आदळला.

डंपरने प्रथम चौकात उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली, त्यानंतर तीन दुचाकींनाही उडवले. या धडकेत ॲक्टीव्हा असंतुलित होऊन पायल गोसावी रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी त्या डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की काही क्षणांतच परिसरात आरडाओरडा व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी डंपर चालक काळू गंगाराम पागे (वय ७०, रा. फुलेनगर, पेठरोड, पंचवटी) याला पकडून चोप दिला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले असून चालकाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या अपघातात सोमनाथ हसे यांच्या चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून अन्य वाहनांचेही नुकसान झाले आहे. दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला असून रस्त्यावर तुटलेल्या वाहनांचे अवशेष आणि दगड विखुरलेले दिसत होते. दरम्यान, भरधाव डंपर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळल्याने थांबला. अन्यथा आणखी मोठी जीवितहानी झाली असती, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताचे नेमके कारण आणि निष्काळजीपणाबाबत अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात झाल्यावर मयत पायलचे विखुरलेले शेव नागरिकांना बघवेत नवते ललित बाविस्कर व अनेक नागरिकांनी यावेळी आंदोलनाचा पवित्रा घेतला तद नंतर येथे यंत्रणा येण्यास सुरूवत झाली. दरम्यान, या चौकात वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी करत तातडीने वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

चालकावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा व मालकांला ही अटक व्हावी व या भिषण अपघाता मयत पायल गोसावी हिची काही चुकी नसतांना तिला अक्षरश: चिरडून टकाले आहे. आमच्या ताईला न्याया मिळावा, अन्यथा आंदोलन तिव्र करू.

– लिलित बाविस्कर, शिवसेना, जिल्हाध्यक्ष नाशिक (व्ही जे एनटी-ब)


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *