नाशिकमध्ये सामाजिक जाणीवेचा उत्सव; राऊंड टेबल व लेडी सर्कलचा पुढाकार

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

नाशिकमध्ये सामाजिक जाणीवेचा उत्सव; राऊंड टेबल व लेडी सर्कलचा पुढाकार

नाशिक प्रतिनिधी : गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे १२ एप्रिल रोजी सामाजिक बांधिलकी जपणारा एक प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन राऊंड टेबल इंडिया (Round Table India) आणि  लेडी सर्कल इंडिया (Ladies Circle India) या सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले होते.

कार्यक्रमात लहान मुलांसाठी विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत धम्माल केली, तर पालकांनाही या कार्यक्रमातून आनंददायी अनुभव मिळाला. या कार्यक्रमाचे संयोजन ऋतू वैश्य आणि मोहेना चड्ढा यांनी उत्कृष्टपणे केले.

‘फ्रीडम थ्रू एज्युकेशन’ हे Round Table India या संस्थेच्या कार्याचे प्रमुख ध्येय असून, प्रत्येक मुलाला सुरक्षित, प्रेरणादायी आणि सुसज्ज शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी संस्था कार्यरत आहे. १९९८ पासून ‘FTE’ उपक्रमांतर्गत भारतातील वंचित घटकांसाठी दर्जेदार शालेय पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. आजपर्यंत संस्थेने १०,०४० हून अधिक वर्गखोल्या उभारल्या असून, ११ दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.

Round Table International ची स्थापना १९२७ साली इंग्लंडमधील नॉर्विच येथे काही तरुण नेत्यांनी केली. मैत्री आणि सेवाभाव या तत्त्वांवर आधारित ही चळवळ आज ५२ हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. हजारो व्यावसायिक आणि समाजसेवकांना एकत्र आणून समाजाच्या उन्नतीसाठी संस्था सातत्याने कार्य करत आहे.

अ-राजकीय आणि अ-धार्मिक स्वरूप असलेल्या या संस्थेमार्फत मैत्री, नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून, या कार्यक्रमातूनही समाजातील सकारात्मक बदलाची दिशा अधोरेखित करण्यात आली.


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *