९ ऑगस्टला भव्य वंजारी समाजरत्न पुरस्कार सोहळा; नवनिर्वाचित आमदार गोकुळभाऊ गिते यांचा नागरी सत्कार
प्रतिनिधी : नाशिक |
वंजारी सेवा संघ व न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य वंजारी समाजरत्न पुरस्कार सोहळा – २०२६ आयोजित करण्यात आला आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार असून, नवनिर्वाचित आमदार गोकुळभाऊ गिते यांचा नागरी सत्कार हा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
या भव्य सोहळ्याचे अध्यक्षस्थान १००८ महामंडलेश्वर मठाधिपती पूज्य नंदगिरी महाराज, भागवताचार्य ह.भ.प. विवेक महाराज केदार (टाहकरी) व भागवताचार्य ह.भ.प. तुळशीराम महाराज गुट्टे भूषविणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन आ. गोविंदराव केंद्रे व वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या शुभहस्ते होणार आहे.
यावेळी मुख्य अभियंता हरीभाऊ कारभारी गिते (मृद व जलसंधारण विभाग), आ. मनोज कायदे, आ. रत्नाकर गुट्टे, ज्येष्ठ समाजसेविका विमलताई आव्हाड, ज्येष्ठ उद्योगपती बुधाजी दादा पानसरे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सोहळ्यात गुजरात राज्यातील प्रसिद्ध उद्योगपती तथा वंजारी सेवा संघाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष मोहन रंगनाथ घुगे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच पोलीस, सामाजिक, अध्यात्मिक, कृषी, वैद्यकीय, राजकीय, प्रशासकीय, उद्योग, पत्रकारिता व देशसेवा अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना वंजारी समाजरत्न पुरस्कार – २०२६ देऊन गौरविण्यात येणार आहे. पत्रकारिता क्षेत्रात बाळासाहेब फड, संतोष सानप आणि अनंता घुगे यांची निवड करण्यात आली आहे.
या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन बाळासाहेब घुगे, बी. के. नागरे, संकेत सानप, सुनील दगडू आप्पा घुगे, डॉ. उल्हास कुटे आणि मारुती इलग सर यांनी केले असून, वंजारी समाजातील सर्व समाजबांधवांनी, युवक-युवतींनी व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्वागत अध्यक्ष यमुना ताई घुगे व डॉ संकेत तुकाराम सानप कार्यक्रमाचे ठि क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था शरणपूर रोड कॅनडा कॉर्नर नाशिक