प्रतिनिधी नाशिक :/ संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये आज गर्दीने या पूर्वीचे सर्व उच्चाॅंक गाठला. शिवभक्तांनी पहाटे ३ वाजेपासून मंदिरात अभूतपूर्व गर्दी केली होती. संस्थांनच्या सुयोग्य नियोजनामुळे कोणतीही अडचण आली नाही. मंदिर उघडल्यापासून मंदिर बंद होईपावेतो तब्बल २ लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज संस्थानने व्यक्त केला आहे.
संस्थांनच्या वतीने वाटप करण्यात येणाऱ्या ५१,१११ रुद्राक्षांचा अभिषेक – पूजन व संस्थांनच्या www.kapaleshwar. in या वेबसाईटचे आज सह धर्मादाय आयुक्त श्री. विवेक सोनुने साहेब यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी संस्थांनाचे अध्यक्ष ऍड. अक्षय कलंत्री, उपाध्यक्षा श्रीमती श्रद्धा दुसाने, सचिव रावसाहेब कोशिरे, विश्वस्त मंडलेश्वर काळे,प्रशांत जाधव, सुनील पटेल यांच्यासह धर्मादाय कार्यालय निरीक्षक एच. के. गाडगे, संस्थान व्यवस्थापक सुनील शिनगाण, शिवेंदू इन्फोटेकचे संचालक कुणाल पाटील, देवस्थान व्यवस्थापन समितीचे नंदू कहार, राजेंद्र आढागळे, जगदीश शेजवळ, प्लखन रणशूर, अविरत सानप, प्रतीक वडनेरे, गणेश शेटे, पप्पू टिळे, संजय थोरवे, सुनील परदेशी, तनिष्क कोशिरे, समर्थ कोशिरे, स्वाती पाटील, नेहा परदेशी, शिवाजी करवल, पूनम मालुसरे, रोहिणी कुमावत, मानसी वाघ आदी उपस्थित होते.
संस्थांनच्या व भाविकांच्या वतीने १२५ किलो साबुदाणा खिचडी, ३५००० राजगिरा लाडू, ८० किलो खोबरं बर्फी, केळी आदी प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जागोजागी थंड पाण्याचे जार उपलब्ध करून देण्यात आले होते.
भाविकांना सुलभ दर्शनाची सुविधा देण्यासाठी संस्थांनचे व्यवस्थापक सुनील शिनगाण, गोकुळ शेवाळे, कविता मांडगे, आशा केदारे, गरुडझेप अकॅडेमीचे स्वयंसेवक, एन बी सिक्युरिटीचे सुरक्षारक्षक, देवस्थान व्यवस्थापन उपसमितीचे समन्वयक आदिनी विशेष परिश्रम घेतले.