–II ● विवेक विचार ● II– सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३६२ वा दिवस

–II ● विवेक विचार ● II–
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३६२ वा दिवस

मनुष्य या जीवनातील बरीवाईट फळे चाखत असतो. तो कांचनाच्या मागे लागलेला असतो. तो इंद्रिय भोगाच्या मागे धावत असतो. जगातील असार, क्षणभंगुर गोष्टींचा तो पाठलाग करीत असतो. वेडेपणाचे ध्येयशून्य जीवन कंठीत असतो. दुसऱ्या एका ठिकाणी उपनिषदांनी मानवी आत्म्याची रथाच्या सारथ्याशी व इंद्रियांची उधळलेल्या, अनियंत्रित अशा घोड्यांची तुलना केली आहे. जीवनातील निष्फळ गोष्टींचा पाठलाग करणाऱ्या मनुष्याचे आयुष्य हे असे असते. जीवमाच्या उषःकाली सोनेरी स्वप्ने पडतात पण नंतर ती खोटी असल्याचे ध्यानी येते. वृद्ध माणसे गत आयुष्यातील गोष्टींचे चर्वितचर्वण करीत असतात. तथापि त्यांना संसाराच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही जगाचे वास्तविक स्वरूप हे असे आहे, तरीही प्रत्येकाच्या जीवनात काही सोनेरी क्षण येत असतात. अत्यंत दुःखातच नव्हे, तर अत्यंत सुखात देखील असे काही क्षण येतात की जेव्हा आत्मप्रकाश रुद्ध करणारे अश्वमेध काहीसे दूर होतात.

                         स्वामी विवेकानंद…

*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर श्रावण २३ शके १९४८*
★ श्रावण शुध्द /शुक्ल २
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. १४ ऑगस्ट २०२६
★ जरा जिवांतीका पूजन
★ पारसी नववर्ष पतेती
★ १९०८ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील, ठाणे जिल्ह्यातील आदिवासींमध्ये जागृतीचे कार्य करणाऱ्या गोदावरी शामराव परुळेकर यांचा जन्मदिन.
★ २०१२ केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचा स्मृतिदिन.

संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *