बाळासाहेब घुगे यांची भाजपा वरिष्ठाकडे मागणी
सिडको:/ आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग विकास आघाडीसाठी किमान एक जागा राखीव ठेवावी, अशी मागणी भाजपचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांनी थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, याच्यसॊबतच मंत्री पंकजाताई मुंडे, भाजपा नेते व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चित्राताई वाघ यांची प्रत्यक्ष भेट घेत; गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात करत असलेली कामे तसेच दिव्यांगांसाठी सातत्याने कार्यरत असून, जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी कायम कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दिव्यांग बांधवांचे सबलीकरण होऊन त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून दिव्यांगांना पक्षाच्या वतीने प्रतिनिधित्व मिळावे. जेणेकरून त्यांच्या समस्या थेट महापालिकेत मांडता येतील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. यावेळी मंत्री महाजन यांनी दिव्यांग बांधवांच्या मुद्यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
