-II ● विवेक विचार ● II–

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३७३ वा दिवस

         दुर्लभं त्रयमेवैतत् देवानुग्रहहेतुकम् ।

मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रय: ॥

जगात तीन गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत, त्यांना दैवी देणगीच म्हणता येईल. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे ‘मनुष्यदेह’ मानवी मनातच ईश्वराचे सर्वोत्कृष्ट प्रतिबिंब विद्यमान आहे माणूस ही ईश्वराची प्रतिमूर्ती आहे असे बायबल म्हणते. दुसरी गोष्ट म्हणजे मुक्त होण्याची प्रबल आकांक्षा ‘मुुमुक्षा’ आणि तिसरी दुर्लभ गोष्ट म्हणजे महापुरुषांचा, सत्पुरुषांचा आश्रय लाभणे होय. जो स्वतः हा मोहमायारूपी समुद्र तारुण गेला आहे असा महात्मा आपल्याला गुरु म्हणून लाभणे हे खरोखरीच भाग्याचे लक्षण आहे. ह्या तिन्ही दुर्लभ गोष्टी जर तुम्हाला लाभल्या असतील तर भगवंताला धन्यवाद द्या. मग तुम्ही मुक्त होणारच होणार. केवळ तर्कबुद्धीच्या द्वारे तुम्ही जे जाणता ते एखाद्या नव्या तार्किक मुद्द्याने कोलमडू शकते परंतु ज्याचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येतो ते कायमचे तुमचे होऊन जाते. ते तुमच्यापासून कधीही आणि कशानेही नाहीसे होणे शक्य नाही ते चिरकाल टिकते.

                             स्वामी विवेकानंद…     

*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*

*★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास ३ शके १९४८*

★ श्रावण शुध्द /शुक्ल १३

★ शालिवाहन शके १९४८

★ शिवशक ३५१

★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७

★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३

★ मंगळवार दि. २५ ऑगस्ट २०२६

★ १८१९ स्वॉटिश यांत्रिक इंजिनिअर, बाष्प शक्तीच्या इंजिनचा शोध लावणारे सुप्रसिध्द शास्त्रज्ञ जेम्स वॉट यांचा स्मृतिदिन.

★ १९२३ लेखक, समीक्षक, साहित्यिक, अर्थतज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिन.

★ २०१२ चंद्रावर पाऊल ठेवणारा जगातील पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा स्मृतिदिन.

संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *