महापालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी – स्थानिक नागरिकांची मागणी
सिडको प्रतिनिधी:/ अवकाळी पावसाने शहरासह नाशिक जिल्ह्यामध्ये थैमान घातल्याने अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती याचबरोबर पावसाळी नाले, गटारी, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले होते तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने मोठे नुकसान ही झाले आहे.
असाच एक प्रकार नवीन नाशिक मधील तानाजी चौक भागात निदर्शनास आला आहे. या ठिकाणी पावसाळी नाल्याचा मोठा भाग खचल्यामुळे नाल्याला मोठे भगदाड पडले आहे. चौकाकडे जाणाऱ्या हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून सतत रहदारी चालू असते त्यामुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता असून नागरिक तसेच वाहनधारक या ठिकाणाहून जाताना जीव मुठीत भरून चालावे लागत आहे. मनपा प्रशासन आहे याची दखल घेऊन त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
