संपूर्ण उत्तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सन २०२४-२५ करिता अध्यक्षपदी कोपरगाव येथील प्रसिध्द तज्ञ कर सल्लागार श्री नितीन डोंगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सन २०२४-२५ साठी पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य याप्रमाणे असतील.
१) श्री नितीन दत्तात्रय डोंगरे, कोपरगाव
(अध्यक्ष )
२) श्री सतीश श्रीपाद कजवाडकर, मालेगाव
(उपाध्यक्ष)
३) श्री सुनील जगन्नाथ देशमुख, नाशिक
(खजिनदार)
४) श्री संजय साहेबराब निकम, धुळे
(सचिव)
५) श्री आनंद लहामगे, अहमदनगर (सह सचिव)
६) श्री अनिल रामराव चव्हाण, नासिक
(मुख्य कार्यवाहक)
७) सीए हेमंत श्रीराम डागा, नाशिक
(संयोजक)
८) श्री योगेश भास्करराव कातकाडे, नाशिक
(जनसंपर्क व मीडिया प्रमुख)
कार्यकारीणी सदस्य
श्री धरमचंदजी पारख, नाशिक
श्री नयन नंदकिशोर निऱ्हाळी, नाशिक
श्री पंकज भामरे, नाशिक
सीए चेतन संजय पाटील, नाशिक
श्री अंबादास गाजुल, अहमदनगर
श्री नितीन दत्तात्रय डोंगरे, कोपरगाव – अध्यक्ष
महाराष्ट्रात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर (Income Tax & GST) स्वरूपाचे कामकाज करणारे कर व्यावसायिक मोठ्या प्रमाणात असून या सर्वांना संघटित करण्याचे काम नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन करत असून गेल्या दोन-तीन वर्षातच संस्थेने स्वतःचा नावलौकिक सबंध महाराष्ट्रभर मिळविला आहे. या संस्थेवर अध्यक्षपदी वर्णी लागली ही माझासाठी अभिमानास्पद बाब असून संस्थेच्या, सभासदांच्या, करदात्यांचे हित जोपासण्यासोबतच सामाजिक जाणीव ठेवून कार्य करण्याचा मानस आहे
सभासदांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांविषयी ज्ञान तसेच करदात्यांना जागरूक करण्याचे कार्य संस्थेमार्फत करण्यात येणार आहे याचबरोबर कर कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये उद्भवणाऱ्या कायदेशीर आणि प्रशासकीय समस्यांवर राज्य आणि केंद्र सरकारच्या प्राधिकरणांना कडे वेळोवेळी निवेदन देईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
श्री अनिल रामराव चव्हाण
संस्थापक अध्यक्ष
नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सदस्य असून एक प्रमुख संघटना म्हणून कर सल्लागार यांना व्यवसायात असलेल्या विविध संधी, दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी, अशा विविध विषयांवर सदस्यांना शिक्षित आणि समृद्ध करून व्यावसायिक होण्यासाठी प्रोत्साहित व सक्षम करण्यासोबतच सदस्यांना व्यावसायिक सक्षमतेमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी आणि यशस्वी करिअरकडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्नशील असलेली अग्रगण्य संस्था म्हणून उदयास आली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी दिली.