नाशिक तसेच महाराष्ट्र मध्ये इतर ठिकाणी पाच दिवस असणार पावसाचा जोर
नाशिक प्रतिनिधी :/ नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचे आगमन झालेले असून आज पासून (दि.१४) पुढील पाच दिवस पावसाचा जोर अनेक ठिकाणी असून काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस होईल. नाशिकसह उत्तर व मध्य महाराष्ट्रात शुक्रवारपासून पावसाचा जोर असणार आहे, तर मुंबईसह विदर्भात व कोकण मध्ये मान्सून पोहचलेल्या काही जिल्ह्यांत २० जूनपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागातील वर्तवला आहे.
मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह विदर्भातील काही जिल्ह्यांत २० जूनपर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे.
तसेच मराठवाडा, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत १८ जूनपर्यंत पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होऊन तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.
Weather Update, Rain, water waterfall