त्र्यंबकेश्वराच्या दर्शनावेळी भक्तांना मारहाण
पोलिस, तहसीलदारांकडून हाेणार चाैकशी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बातम्यांसाठी जॉईन व्हाट्सअप ग्रुप
प्रतिनिधी :/ त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुरक्षारक्षकाने केलेल्या मारहाणीची जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी (दि.१७) शर्मा यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देत पोलिसांसह तहसीलदारांनाही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यात दाेषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
नाशिकचे भाविक महेंद्र सूर्यवंशी हे रविवारी कुटुंबियांसह त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले. दर्शन करत असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना बाहेर काढण्याची घाई केली. लागून अलेल्या सुट्यांमुळे आधीच गर्दी असल्याने तास् न तास लांगेत उभे राहून कसेबसे दर्शनाची वेळ आली अन् त्यातच सुरक्षारक्षकांनी केलेली घाई यामुळे महेंद्र यांचे सुरक्षारक्षकांसोबत वाद झाले. यातून सुरक्षारक्षकांनी उद्धट वर्तन करत मारहाण केल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी शर्मा यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.