संत निवृत्तिनाथ पालखी सोहळा आज नाशिक शहरात, वाहतुकीत करण्यात आले महत्वाचे बदल
नाशिक प्रतिनिधी /: संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे शनिवारी दि. २२ जून रोजी सकाळी 9 वाजता शहरात आगमन होत आहे. सातपूर येथे मुक्कामी असलेली पालखी शनिवारी नाशिक शहरातून जाणार असल्याने पुढील प्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
नाशिक शहरात पालखी निमित्त वाहतूक मार्गात करण्यात आलेले महत्त्वाचे बदल खालील प्रमाणे
यामार्गावर प्रवेशबंद: पंचायत समिती कार्यालय ते मोडक सिग्नलकडे, मोडक सिग्नलते अशोकस्तंभाकडे एकेरी मार्गावर प्रवेश बंद, अशोकस्तंभ तेरविवार कारंजा, कारंजाते धुमाळ पॉइंट, गाडगे महाराज पुतळा, बादशाही कॉर्नर, महात्मा फुले मार्केट, काझीपुरा पोलिस चौकीकडे जाणाऱ्यावयेणाऱ्या मार्गावरील सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद, गणेशवाडी ते अमरधामरोड, द्वारकाकडे जाणाऱ्या-येणाऱ्या मार्गावर प्रवेश बंद, द्वारका ते नाशिकरोडकडे जाणाऱ्या एकेरी मार्गावर प्रवेश बंद राहणार आहे. दत्तमंदिर सिग्नल येथून बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गावर वाहनांना प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग: मोडक सिग्नल ते पंचायत समिती एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतुक सुरू राहील. रविवार कारंजा ते धुमाळ पॉइंट, गाडगे महाराज पुतळा जाणारी वाहतूक रविवार कारंजा टिळकपथ सिग्नलमार्गे इतरत्र जातील, गाडगे महाराज पुतळा ते बादशाही कॉर्नर जाणारी वाहतूक शालिमार, खडकाळी सिग्नलमार्गे इतरत्र जाईल. बादशाही कॉर्नर ते महात्मा फुले मार्केटकडे जाणारी वाहतूक गाडगे महाराज पुतळा शालिमार खडकाळी सिग्नलमार्गे इतरत्र जाईल. महात्मा फुले मार्केट ते काझीपुरा पोलिस चौकी वाहतूक दूधबाजार, खडकाळी सिग्नल, सारडा सर्कलमार्गे इतरत्र जाईल. नाशिकरोड ते द्वारका सर्कल या एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू राहील. द्वारका सर्कलकडून जेलरोडकडे जाणारी वाहतूक द्वारका, टाकळीरोड, इंदिरा गांधी चौक येथून जेलरोडमार्गे इतरत्र जाईल. पालखी उपनगर सिग्नल पास झाल्यानंतर वाहतुक उपनगर सिग्नल येथून डाव्या बाजूकडे वळून आम्रपालीनगरमार्गे जेलरोडकडे जाईल. पुणे-नाशिक मार्गावरील सर्व जड अवजड वाहने, एसटी बस दत्त मंदिर चौक येथूनच वीर सावरकर पुलावरून सिन्नर फाट्याकडे जातील.