किरकोळ वादावरून क्रिकेट बॅटनेन बँक कर्मचाऱ्यावर हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
जुने नाशिक येथे चार दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून बँक ऑफ बडोदामधील कर्मचारी जितेंद्र गुलाबसिंग ठाकूर यांच्यावर क्रिकेट खेळण्याच्या बॅटने डोक्यात चार-पाच वार करून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. तसेच या हल्ल्यात त्यांची पत्नी सुनीता आणि मुलगा विनायक यांनाही जबर मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर जितेंद्र ठाकूर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच हल्ला करणाऱ्यांविरोधात तात्काळ भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सनी मोजाड, राजेंद्र मोजाड व बंटी चव्हाण या हल्लेखोरांना ताब्यात घेऊन यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.