प्रतिनिधी:/ नवीन नाशिक उंटवाडी भागातील जगतापनगरमध्ये राहणारी ११ वर्षीय दिव्या त्रिपाठी ही शाळकरी मुलगी नेहमीप्रमाणे मंगळवार दि. २५ सकाळी उपेंद्रनगर येथील रूद्र इंग्रजी शाळेत आली. तिने इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश केला अन् चक्कर आल्याने जमिनीवर कोसळली. ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दिव्याला मयत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेने दिवसभर शाळेत व जगतापनगर भागात हळहळ व्यक्त केली गेली. दिव्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे