प्रतिनिधी /: नविन नाशिक त्रिमूर्ती चौक येथे शाळेच्या बस आणि दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात अठरा वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बुधवारी दि. २६ सकाळी ११ वाजेच्या दरम्यान दिव्या ऍडलॅब कडून त्रिमूर्ती चौक रस्त्याकडे येणारा दुचाकी चालक मयूर दत्ता गुंजाळ रा. सिडको राणाप्रताप चौक हा त्याच्या इलेक्ट्रिकल बाईक वरून जात असतांना यावेळी येथूनच जाणारी एका खासगी शाळेची बसच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने अपघात झाला.
यावेळी येथील जमा झालेल्या लोकांनी मयूर गुंजाळ यास त्वरित उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत