प्रतिनिधी :/ राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज १० व्यांदा अर्थसंकल्प यावेळी अजित पवार यांनी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय…’ असा गजर करत अर्थसंकल्पाला सुरुवात केली. तसेच आषाढी वारीचे औचित्य साधत त्यांनी वारकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या.वारीच्या प्रतिदिंडीस 20 हजार रुपयांचा निधी:संत श्री तुकाराम महाराजांचं नाव घेत अजित पवारांनी अर्थसंकल्पाची सुरुवात केली. मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच, वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान करणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना, प्रतिदिंडी 20 हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच, वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात येणार असल्याचेही घोषित केले.
Related Posts
नाशिककरांचा एल्गार; रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मोठे जनआंदोलन उभारणार
नाशिककरांचा एल्गार; रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मोठे जनआंदोलन उभारणार नाशिक l प्रतिनिधी: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे चालू…
शुभम पार्क येथे भरधाव बाईक रायडरचा थरार वाटसरू रक्तबंबाळ; ट्रिपल सीट युवक पसार
शुभम पार्क येथे भरधाव बाईक रायडरचा थरार वाटसरू रक्तबंबाळ; ट्रिपल सीट युवक पसार 📍 नाशिक | प्रतिनिधी नाशिक शहरातील शुभम…
पंपिंग स्टेशनवरील स्टार्टर जळाल्याने नवीन नाशिक शहरातील पाणीपुरवठा खंडित
सततच्या तांत्रिक अडचणीमुळे होणाऱ्या पाणी टंचाईने सिडकोवासीयांचे हाल नाशिक प्रतिनिधी /: नवीन सिडकोतील अनेक भागा मध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस…
