आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित साद स्वरांची पाडवा पहाट मैफली रंगली

प्रतिनिधी इंदिरानगर – आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित साद स्वरांची पाडवा पहाट मैफलीस ओकार स्वरूपा तुज नमो या ईश्वर स्थवनाने प्रारंभ झाला. डीजेपी नगर एक येथील विघ्नहरण गणेश मंदिराच्या प्रांगणात गायक सागर म्हात्रे,श्वेता दांडेकर आणि ओंकार कानेटकर यांनी जय शारदे वागिश्वरी,अमृताहुनी गोड नाम तुझे देवा आदी पारंपरिक लोक,भाव भक्ती गी गीते सादर केली, तर राधा ही बावरी,अबीर गुलाल,जय शंकरा गंगाधरा, ग साजणे,स्वयंवर झाले सीतेचे,पिया रे पिया रे,हे माय भवानी’ गीतांच्या सादरीकरणातून गायकांनी ‘साद स्वरांची’ मैफलीतून
सुरांचा आविष्कार केला. रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.अमोल पाळेकर, जयेश भालेराव,आनेश आढाव, सुशील केदारे,
ऋषिकेश देशमाने यांनी साथसंगत केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदे मातरम प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सतीश कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक वैभव कुलकर्णी यांनी केले.आयोजकआभार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्या कुलकर्णी यांनी मानले.

जाहिरात_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *