नाशिक प्रतिनिधी:/ कपालेश्वर महादेव मंदिराच्या कार्यकारिणीची नुकतीच पार पडलेल्या बैठकीत अध्यक्षपदी ॲड अक्षय कलंत्री तर सचिवपदी ॲड प्रशांत जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदरील कार्यकारिणी हि १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीसाठी असणार आहे. या निवडणुकीत उपाध्यक्षपदी सुनील तुलसीदास पटेल, सचिवपदी ॲड प्रशांत जाधव, खजिनदारपदी सीए श्रीकांत राठी यांची एकमताने निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचे विश्वस्त मंडलेश्वर काळे, रावसाहेब कोशिरे आणि श्रद्धा कोतवाल (दुसाने) व भाविकांनी अभिनंदन केले. यासोबतच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत असून याप्रसंगी उत्तर महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितिन डोंगरे, जनसंपर्क प्रमुख योगेश कातकाडे, जॉईंट सेक्रेटरी व अहमदनगर शिवसेना जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे तसेच संचालक अंबादास गाजुल यांनी, असोसिएशनच्या वतीने, नूतन अध्यक्ष ऍड. श्री. अक्षय कलंत्री तसेच नूतन सचिव ऍड. प्रशांत जाधव यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.