अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच…
सिडको प्रतिनिधी/: नवीन नाशिक या ठिकाणी महानगर पालिका अतिक्रमण विरोधी कारवाईचा धडाका लावला असून नवीन नाशिक मधील त्रिमूर्ती चौक, पवन नगर, गोविंद नगर यानंतर अतिक्रमण विभागाने पाथर्डी फाटा कडे लक्ष केंद्रित करून या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.
पाथर्डी फाटा या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत असून यापूर्वी देखील कारवाई करण्यात आलेली आहे. अनधिकृतपणे रस्त्यांवर स्टॉल लावणारे, खाद्य पदार्थ विक्री करणारे, फळ विक्रेते, टपरी धारक यामुळे रस्त्यांवर गर्दी वाढत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे याचबरोबर मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करून मोठं मोठी दुकाने थाटली जात आहे. पाथर्डी फाटा रोड लगत असलेल्या वाईन शॉप समोरील अनाधिकृत खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरती यावेळी कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमे दरम्यान विभागीय अधिकारी जयश्री बैरागी, अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागाचे प्रमुख निखिल तेजाळे मधुकर गायकवाड तसेच जीवन ठाकरे नाना अभंग भगवान सूर्यवंशी प्रकाश नाठे रवींद्र काथवटे मंदार परांडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
