नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स, अहमदनगर व मालेगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांचा संयुक्त उपक्रम
नाशिक प्रतिनिधी :/जीएसटी परिषदेच्या ५४ व ५५ व्या बैठकीत जीएसटी कायद्यातील तरतुदी बाबत अनेकविध बाबींवर चर्चा व निर्णय घेण्यात आले. यातील बहुतांशी निर्णय हे व्यापारी, करदात्यांवर प्रभाव टाकणारे आहेत. जीएसटी कायद्यात सुधारणा/बदल याचबरोबर जीएसटी संरचनेत होऊ घातलेले बदल, थकीत करदात्यांना दिलासा देणारी जीएसटी विभागाची “अभय योजना” अशा अनेक महत्वपूर्ण बाबींची तपशीलवार माहीती राज्यातील कर सल्लागार, व्यापारी व करदाते यांना सोप्या भाषेत समजून घेता यावी याकरिता नाशिक मधील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट व जीएसटी अभ्यासक तज्ञ सीए चेतन बंब यांचे नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स च्या वतीने येत्या गुरुवार दि. ९ जानेवारी २०२४ रोजी “ऑनलाईन वेबिनारचे” आयोजन करण्यात आले आहे.
“जीएसटी कायद्यात सात्यताने होणारे बदल /सुधारणा तसेच जीएसटी कायदयातील नवीन तरतुदी, करण्यात आलेल्या बदलांची
कर क्षेत्रातील व्यावसायिकांना, व्यापारी वर्गाला माहिती व्हावी, त्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याविषयी या वेबिनार मुळे, सखोल व अद्यावत ज्ञान प्राप्त करून घेता येणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त कर सल्लागार, सीए, वकील तसेच जीएसटी कायद्याशी संबंधित, अभ्यासक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी केले आहे”.
वेबिनार नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ८८८८३३३८८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.