दिवाळी मंगलमय सणाचे औचित्य साधत सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित शिशु विहार व बालक मंदिर ‘स्वर प्रभात’ हा संगीतमय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

आली दिवाळी सजून धजून लक्ष दिव्यांची आरास घेऊन तमाच्या तळी ज्योती माळून पहाट तेजोमयी मनात उजळे

या मंगलमय सणाचे औचित्य साधत सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित शिशु विहार व बालक मंदिर इयत्ता १ली ते ७वी शाळेत ‘स्वर प्रभात’हा संगीतमय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.शाळेत दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते. या वर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्टेज डेरिंग यावे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. दिवाळीचे स्वरूप कसे असावे याची माहिती विद्यार्थ्यांना कळावी, शेवटच्या दिवशी दिवाळीचा आनंद घेता यावा या उद्देशाने दिवाळीनिमित्त पहाटे गाण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

  कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते करून करण्यात आले.कार्यक्रमात बोगो श्री इनामदार, तबला व साथ सांगत विद्यार्थी सोनवणे निरांत ,पाठक स्वानंद यांनी केली.

पहाट पाडव्याची सुरुवात नांदि ने करण्यात आली.

बालगीत ,अभंगवाणी, गवळण, जागर भारुड, गोंधळ, देशभक्तीपर,दिवाळी ची गाणे अशा विविध गाण्यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनीच केले.

सर्व वातावरण विद्यार्थ्यांच्या गाण्याने सुरमय झाले होते. पालक श्रोत्यांनी पण तल्लीन होऊन गाण्यावर ठेका धरला होता.

 वसुबारस ,धनत्रयोदशी ,नरक चतुर्थी ,बलिप्रतिपदा, भाऊबीज या सणा विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली व सणांचे महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रमाची सांगता भैरवी रागाने करण्यात आली.

कार्यक्रमासाठी मार्गदर्शन मुख्याध्यापिका सौ नीता पाटील,शालेय समिती अध्यक्षा सौ सुवर्णा दाबक मॅडम , शाळेच्या ,सौ.निर्मल अष्टपुत्रे मॅडम यांचे लाभले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगीत शिक्षिका सौ मनीषा इनामदार व सौ सावनी कुलकर्णी व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *