Deprecated: version_compare(): Passing null to parameter #2 ($version2) of type string is deprecated in /home/wagh/public_html/wp-content/plugins/elementor/core/experiments/manager.php on line 170
३६ लाखांना घातला गंडा,  तोतया आयपीएस मिश्रावर अजून एक फसवणुकीचा गुन्हा दाखल  - नाशिक बातमी

३६ लाखांना घातला गंडा,  तोतया आयपीएस मिश्रावर अजून एक फसवणुकीचा गुन्हा दाखल 

नाशिक प्रतिनिधी /: अंबड भागातील महालक्ष्मी नगर येथील राहणाऱ्या आयपीएस अधिकारी असल्याचा बनाव करून फसवणूक करणाऱ्या मिश्रावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. लॉन्ड्री व्यावसायिकाला रेल्वेच्या लॉन्ड्रीचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवून तब्बल ३६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

दर्शन लल्लुराम कनोजिया ४३, रा. गंगा हाईट्स, गजानन नगर, पाथर्डी फाटा यांच्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०१७ ते ऑक्टोबर २०२४ यादरम्यान, संशयित मिश्रा हा कनोजिया यांच्या संपर्कात आला असता त्यांच्या लाँन्ड्री व्यवसायाची माहिती घेत यावेळी संशयित मिश्राने रेल्वेतील कपडे धुलाईच्या कॉन्ट्रॅक्ट ची माहिती देत ‘मी भारतीय रेल्वेमध्ये आयपीएस दर्जाचा अधिकारी असून सध्या महानिरीक्षक पदावर कार्यरत आहे,’ असे सांगत त्याचे ओळखपत्रही दाखविले. रेल्वेत तुम्हालाही चांगले टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी त्यांच्याकडून ३६ लाख ६४ हजार रुपये उकळले. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी रेल्वेमध्ये कॉन्ट्रॅक्ट चे काम न झाल्याने कनोजिया यांनी मिश्राकडे पैसे परत मागितले असता, त्याने त्यांच्याच घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *