द्वारका उड्डाण पुलावर भीषण अपघात: ३ ते ४ जण जागीच ठार तर ५ ते ६ गंभीर जखमी.
नाशिक | द्वारका उड्डाण पुलावर आज सायंकाळी सात ते साडे सात दरम्यान आयशर ट्रक (MH 25 U 0508) आणि पिकअप छोटा हत्ती (MH 15 FV 5601) यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात तीन ते चार जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे, तर पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, गाडीत सिडकोतील सह्याद्री नगर येथील तरुण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघाताच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी धाव घेत मृत आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले. भद्रकाली व मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून मदत कार्य सुरू केले.
जखमींना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे पुलावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
द्वारका उडान पुलावर झालेल्या अपघातातील मृतांची नावे अशी…
१) अतुल संतोष मंडलिक (२२),
२) संतोष मंडलिक(५६),
३) यश खरात,
४) दर्शन घरटे,
५) चेतन पवार (१७)
व जखमींची नावे अशी…