जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या
शिवसेना ठाकरे गट नाशिक महानगरचा ठराव
नाशिक प्रतिनिधी:/ जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात यावा,अशी एकमुखी आग्रही मागणी करणारा ठराव शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगरतर्फे संमत करण्यात आला.
हिंदुहुदय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 99 वी जयंती 23 जानेवारीला नाशिक महानगरात उत्साहात साजरी करण्यात येणार असून त्याच्या नियोजनासंदर्भात शालिमार कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यात वरील मागणीचा ठराव संमत झाला.शिवसेना कोअर कमिटी सदस्य मुख्यमंत्र्यांची तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने नाणे काढून ते राष्ट्राला समर्पित केले त्याच धर्तीवर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याच्या जन्मशताब्दी वर्षात नाणे काढून ते राष्ट्राला समर्पित करावे असेही यावेळी ठरविण्यात आले.
तसेच 23 जानेवारी 2025 ते 23 जानेवारी 2026 या वर्षभराच्या काळात दर महिन्याला सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक आदी कार्यक्रम राबवण्याचा निर्णयाही यावेळी घेण्यात आला.
व्यासपीठावर उपनेते बबनराव घोलप,सुनील बागुल,राज्य संघटक विनायक पांडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर,खा.राजाभाऊ वाजे, महानगरप्रमुख विलास शिंदे,लोकसभा संघटक बाळासाहेब पाठक,उपजिल्हाप्रमुख जगनराव आगळे,महेश बडवे,सचिन मराठे,गुलाब भोये, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे,राहुल दराडे,महानगर संघटक सचिन बांडे,देवा जाधव,शैलेश सूर्यवंशी, सुभाष गायधनी,युवा सेना राज्य विस्तारक प्रविण चव्हाण,संटाणा तालुका संपर्कप्रमुख विकास गिते आदी होते.
बैठकीस दिलीप मोरे,उत्तम कोठुळे,मधुकर हिंगमिरे,राजेंद्र क्षीरसागर,ऋषी वर्मा,संजय चिंचोरे,प्रमोद नाथेकर,नीलेश साळुंखे,सुभाष शेजवळ,मसूद जिलानी,विनोद नुनसे,पंकज जाधव,विरेंद्र टिळे,विष्णू पवार,सुनील पाटील, संदेश फुले,कमलेश परदेशी,सुनील निरगुडे,कैलास चुंबळे,नंदू वराडे,साबी सिंग,नाना पाटील,सीमाताई डावखर,कीर्ती निरगुडे, श्रद्धा कोतवाल,द्वारका गोसावी,शोभा वालडे,मीना देवकर,निलोपर शेख,सिंधू पगार तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.