नाशिक: नाशिक शहरात (आज दि.22 रोजी) ‘पोलिस आपल्या दारी’ या उपक्रमात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी समजून घेणार
नाशिक प्रतिनिधी/: ‘पोलिस आपल्या दारी’ हा उपक्रम आज, बुधवारी दि. २२ रोजी नाशिक शहरात घेण्यात येणार आहे. या उपक्रमात नाशिक शहरातील विविध भागात पोलिस आयुक्तांसह उपआयुक्त, सहायक आयुक्त ठीक सकाळी ११ वाजता नागरिकांची भेटी घेऊन त्यांच्या तक्रारी समजून घेणार आहेत. तसेच नागरिकांना तांच्या तक्रारी या उपक्रमात पोलिस अधिकाऱ्यांकडे मांडण्याची संधी मिळणार आहे.
आज दि.22 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता या ठिकाणी उपक्रम घेण्यात येईल आणि त्या ठिकाणी येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे नावे खालील प्रमाणे
रामकुंड पोलिस चौकी: आयुक्त संदीप कर्णिक
दुध बाजार पोलिस चौकी: उपायुक्त किरणकुमार चव्हाण
पाटीलनगर गार्डन, अंबड पोलिस ठाणे: उपायुक्त प्रशांत बच्छाव
सातपूर गाव पोलिस चौकी: उपायुक्त चंद्रकांत खांडवी
आनंदनगर पोलिस चौकी, इंदिरानगर: सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ना. रोड: उपायुक्त मोनिका राऊत
कुलकर्णी गार्डन: सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव
मारुती मंदिर, आडगाव: सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बढे
म्हसरूळ गाव पोलिस चौकी: सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके
शाळा क्र. १२५, जॉगिंग ट्रॅक, उपनगर: सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी