संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वर नगरीत वारकऱ्यांची दर्शनासाठी मोठी गर्दी

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वर नगरीत वारकऱ्यांची दर्शनासाठी मोठी गर्दी

त्रंबकेश्वर प्रतिनिधी :/ संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त सर्व वारकरी जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष करत तसेच त्र्यंबक नगरीत टाळ-मृदुंगाच्या गजराने आणि विठुनामाच्या जयघोषाने संपूर्ण त्र्यंंबकेश्वर नगरी आनंदमय झाली आहे. विठ्ठल-रखुमाई, निवृत्तिनाथ महाराजांच्या प्रतिमेच्या रथासह वारकर्‍यांच्या दिंड्यांचे रथ अशी मोठी गर्दी त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पाहायला मिळते. त्रंबक नगरीमध्ये दर्शनासाठी राज्यभरातून वारकरी पायी दिंडीच्या माध्यमातून त्र्यंंबकेश्वर मध्ये आले आहेत. शनिवारी निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा भरत असल्याने राज्यभरातून मोठ्या संख्यने दिंड्या त्र्यंंबकेश्वरच्या नगरीत आलेले आहेत. एकूण ४०० दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये असण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *