प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत काचुर्ली आश्रमशाळेच्या ३३ विद्यार्थ्यांचे यश

प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत काचुर्ली आश्रमशाळेच्या ३३ विद्यार्थ्यांचे यश

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मराठा विद्या प्रसारक समाज,नाशिक संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, काचुर्ली येथील विद्यार्थ्यांनी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ४थी व ७ वी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण ३३ विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी ठरले असून त्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता ४थीचे जाधव महिमा अशोक ,शेवरे दीपाली हरी ,जाधव दुर्वा मोहन ,निरगुडे कृष्णा सनू ,झुरडे कुमार योगेश,माळगावे महेश कृष्णा ,खेडुलकर ओमकार लक्ष्मण ,बेंडकोळी ओमसाई रामदास,उघडे पुनम शिवाजी ,जाधव प्रिन्स पवन,वारघडे साक्षी मोहन,शेंडे शाम धर्मा ,पारधी श्रेया भगवान,खेडुलकर उज्ज्वला हरिचंद्र ,पारधी यादव रामा तसेच इयत्ता ७ वीचे खेडुलकर कल्याणी लक्ष्मण, बेंडकोळी रजनी राजू, खेडुलकर गोरख कृष्णा, पोटिंदे कामिनी मोहन, भोये नंदा किसन, दोरे कृष्णा विजय, जाधव जयश्री विठ्ठल, पिंपळके तानाजी चिंतामण, बदादे हेमराज गोकुळ, देशमुख राणी विष्णू, निरगुडे जयश्री सनू, बदादे दुर्गा देवराम, बदादे प्राजक्ता विष्णू, भोये अंकिता सीताराम, भुसारे भरत रमेश, खेडुलकर खुशाल हरिचंद्र, खोडे अरुणा पिंगा आणि पालवे प्रसाद दामू यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक श्री. सचिन शेवाळे तसेच श्री.नवनाथ ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, संचालक श्री. रमेशआबा पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ.ज्ञानेश्वर लोखंडे, शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक श्री. गौतम कटारे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला, पालकांच्या सहकार्याला आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला या यशाचे श्रेय देण्यात आले. या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून परिसरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *