सिडकाेत पाण्याच्या माेटारचा वापर करणाऱ्यांची धरपकड; १० माेटारी जप्त; दंडात्मक कारवाईची माेहीम

नाशिकच्या सर्व बातमी अपडेट साठी आमचा “नाशिक बातमी” व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

सिडकाेत पाण्याच्या माेटारचा वापर करणाऱ्यांची धरपकड; १० माेटारी जप्त; दंडात्मक कारवाईची माेहीम

नाशिक प्रतिनिधी /: नवीन नाशिक (सिडको) विभागाअंतर्गत अतिक्रमण मोहिमे पाठोपाठ महापालिकेच्या आता नळाला पाण्याची मोटार लावणाऱ्यां विरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत जवळपास दहा मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.तसेच पाणी मीटर नसेल तर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार सिडको परिसरातील मधील महाराणा प्रताप चौक व सप्तशृंगी चौकात पाणीपुरवठा विभाग, घरपट्टी व पाणीपट्टी तसेच आरोग्य विभागामार्फत संयुक्तरित्या ही मोहीम राबवण्यात येत आहे. या भागात अनेक ठिकाणी नळ कनेक्शनच्या नळाला पाण्याची मोटर लावल्याने त्या पाणी ग्राहकांची मोटारी जमा करून घेण्यात आल्या आहेत.

मनपाच्या सिडको विभागातील घरपट्टी पाणीपट्टी विभागामार्फत मीटर नसलेल्या तसेच मीटर बंद असलेल्या नळ ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. ही मोहीम विभागीय अधिकारी जयश्री बैरागी व पाणीपुरवठा उपअभियंता ए. जे. काझी आदींसह कर्मचारी सहभागी झाले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *