आरबीआय कडून गृह कर्जदारांना दिलासा

अखेर ५ वर्षाच्या दिर्घ काळानंतर व्याज दरात कपात
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण विषयक समितीच्या बैठकीनंतर पत धोरण जाहीर केलं. संजय मल्होत्रा यांनी रेपो रेट ६.५० वरुन २५ बेसिस पॉईंट कमी करुन ६.२५ टक्के केलं आहे. याचा बँकिंग व वित्तीय क्षेत्राकडून होणाऱ्या कर्ज पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँक आणि गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था व्याज दरात कपातीबाबत घोषणा करु शकते.
आरबीआयच्या रेपो रेटच्या कपातीनंतर गृह कर्ज, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याज दरात कपात होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सर्वसामान्य गृह कर्जदारांना दिलासा मिळू शकेल.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *