भूमीअभिलेख विभागाकडून सातबारा उताऱ्याच्या नियमांत बदल

भूमीअभिलेख विभागाकडून सातबारा उताऱ्याच्या नियमांत बदल

सातबारा उताऱ्यांवरील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलम 155 च्या वापराबाबत आता भूमिअभिलेख विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
यापुढे या कलमांतर्गत कोणतीही फेरफार नोंद फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारली जाईल. कुठल्याही स्वरूपात ऑफलाइन फेरफार करण्यास सक्त मनाई आहे.

काय सांगितले भूमीअभिलेख विभागाने ?

▪️ नवीन आदेशानुसार, सर्व फेरफार नोंदी एकाच दिवसात ऑनलाईन प्रणालीत करणे बंधनकारक करण्यात आले.

▪️ ऑनलाईन पडताळणी तलाठ्याच्या लॉगिनवर आदेश प्राप्त झाल्यानंतर, त्या आदेशाची नोंद कुणी, कधी आणि कशी केली याची ऑनलाईन पडताळणी केली जाणार आहे.

▪️ या नव्या प्रणालीमुळे सातबारा उताऱ्यांवरील फेरफार प्रक्रियेमधील अनियमितता, भ्रष्टाचार आणि अनधिकृत हस्तक्षेपावर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

▪️ आधी अनेकांना फेरफार प्रक्रियेसाठी तलाठ्यांच्या कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत असत, मात्र आता ही प्रक्रिया सरळ, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

 

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *