नॅबच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित आमदार व खासदार यांचा सत्काराचे आयोजन 

नॅबच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित आमदार व खासदार यांचा सत्काराचे आयोजन 

दि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड डिस्ट्रिक्ट युनिट नॅब (नॅब) नाशिक शाखेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित आमदार व खासदार यांचा सत्कार रविवारी दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वा. नाशिक – त्र्यंबकेश्वर रोड, बेळगाव ढगा येथील नॅब च्या अंध व ज्येष्ठ वृद्धाश्रम येथे करण्याचे योजिले आहे.

यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, भास्कररावजी भगरे, डॉ सौ. शोभा बच्छाव तसेच आमदार दादाजी भुसे – शिक्षण मंत्री, माणिकरावजी कोकाटे – कृषीमंत्री, नरहरजी झिरवळ – अन्न व औषध मंत्री याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व नाशिक जिल्ह्यातील आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, आमदार राहुल ढिकले व आमदार राहुल आहेर, आमदार सुहास कांदे, आमदार हिरामण खोसकर, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सत्यजित तांबे, आमदार दिलीप बोरसे, आमदार किशोर दराडे, यांचा देखील सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री कांतीलाल जी चोपडा, उद्योगपती आणि थोर समाज सुधारक व सिन्नर येथील ज्येष्ठ कर सल्लागार व उद्योगपती श्री नंदकिशोर जी निराली, हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

बेळगाव ढगा येथील अंध व जेष्ठ वृद्धाश्रमाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. संस्थेचे ५५ हजार स्क्वेअर फुटा पैकी आजवर ३५ हजार स्क्वेअर फुटाचे काम पूर्ण झालेले आहे. समाजातील दानशूर व्यक्तिमहत्व/ संस्था यात अतिशय मोलाचे सहकार्य लाभलेले मराठा विद्या प्रसारक व इतर अनेक सामाजिक संस्था यांच्या पुढाकारानेच हा अंध व जेष्ठ वृद्धाश्रमाचा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
या कार्यक्रमास समाजातील सर्व नामवंत, जेष्ठ – श्रेष्ठ व दानशूर लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्री प्रकाशचंद्रजी सुराणा. अध्यक्षा विद्युलता तातेड, सचिव शितल सुराणा, कार्याध्यक्ष श्री अनिल चव्हाण व फंड रेझिंग चेअरमन श्री मोहनलालजी लोढा यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण 

राष्ट्रीय अंध कल्याण संस्था, नाशिक.

बेळगाव ढगा, त्र्यंबक रोड, नाशिक.

मो. 9890487399

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *