महापालिका आयुक्तांना हजर हाेण्याचे वक्फ न्यायाधिकरणाचे आदेश

महापालिका आयुक्तांना हजर हाेण्याचे वक्फ न्यायाधिकरणाचे आदेश

काठेगल्लीतील धार्मिक स्थळाचा निर्णय आता ५ मार्चला हाेणार

नाशिक : वक्फ न्यायाधिकरणाचे मनाई आदेश असतानाही महापालिकेने त्या जागेवर कारवाई का केली, दर्गाह अनधिकृत ठरविण्याचा व त्याचे अतिक्रमण तातडीने काढण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला, असे प्रश्न उपस्थित करत सोमवारी (दि. ३) वक्फ न्यायाधिकरणाने महापालिका आयुक्तांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता या धार्मिक स्थळाच्या प्रकरणाला नवीन वळण मिळणार आहे. याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

काठे गल्ली परिसरातील कॅमल हाउसला लागून असलेल्या सिडनी टॉवरशेजारील हजरत सय्यद सातपीर बाबा दर्ग्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे शनिवारी (दि. २२) दिसून आले. दर्गा अनधिकृत असल्याचा दावा करीत तो तत्काळ हटविण्याची मागणी केली होती. दुसरीकडे दर्गा ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांसह मुस्लिम संघटनांनी एकत्र येत दर्गा अधिकृत असून, वक्फ बोर्डाच्या मालकीचा असल्याचे सांगत कारवाईला विरोध केला होता. दोन्ही गट आमनेसामने आल्याने, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, अतिक्रमणाच्या कारवाईनंतरही परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे.तसेच, आता या दर्गाहची सुनावणी सोमवारी छत्रपती संभाजी नगर येथील वक्फ न्यायाधिकरणात झाली.यावेळी वक्फ न्यायाधिकरणाने महापालिकेने दर्गाह केलेल्या अतिक्रमणावर केलेल्या कारवाईवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पुढील सुनावणीसाठी महापालिका आयुक्तांना हजर राहण्याचे सूचना केले आहे.यामुळे आता 5 माजला होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष त्याकडे लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *