फर्निचर दुकानाला आग; साहित्याचे मोठे नुकसान
प्रतिनिधी सातपूर :/ सातपूर अंबड लिंक रोडच्या बजरंग नगर येथील असलेल्या चार फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना ( दी 23) रात्री 1.55वाजता घडली घडली आहे.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1.55वाजता सातपूर लिंक रोडवरील बजरंग नगर येथील अमीर फर्निचर सह बाजूच्या तीन एक फर्निचरला दुकानाला भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी लाकडी दिवाण, खुर्ची, इतर लाकडी साहित्य असे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. सातपूर, सिडको, मुख्यालय एमआयडीसी सहा बंब लिडिंग फायरमन एस.आर पगार, एस,आर जाधव, डी.बी दराडे, विजय ठाकूर, हिरामण पवार अग्निशामन दलाच्या
जवानांनी तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
—
अवैधपणे फर्निचर दुकानाचे जाळे, सुरक्षा साधनांचा अभाव
या ठिकाणी दाटीवाटीने फर्निचर दुकान असून कुठलेही सुरक्षा साधनांचा वापर केल्या गेल्याची नसल्याची बाब पाहनीत दिसून आली. अनेक अग्निशामक दलाने फर्निचर दुकानाच्या बाजूला वं मागे असलेल्या प्लस्टिक वं इतर भंगार दुकानापर्यत आग पसरू न दिल्याने मोठा अनर्थ टळला आहे.याबाबत फर्निचर मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास टाळले आहे.