ऐकावं ते नवलच!  शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तरात आढळून आले शस्त्र, कंडोम आणि इतर आक्षेपार्ह वस्तू

ऐकावं ते नवलच! 

शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तरात आढळून आले शस्त्र, कंडोम आणि इतर आक्षेपार्ह वस्तू

प्रतिनिधी:/

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तरात चक्क फायटर, सायकलची चेन, चाकू, पत्त्यांचे कॅट, कंडोम अशा अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे विद्यार्थी माध्यमिक शाळेतील असल्याचे समोर येत आहे.

विद्यार्थी घडविताना त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे, शिस्त लागावी या उद्देशाने शाळेतील शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवत असतात याचाच एक भाग म्हणून शिक्षकांकडून अचानक विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली असता आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इयत्ता आठवी नववी व दहावीतील काही विद्यार्थ्यांच्या दप्तरांमध्ये फायटर, सायकलची चेन, चाकू, पत्त्यांचे कॅट, कंडोम अशा अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्यात. विद्यार्थी चक्क दप्तरात या वस्तू बाळगत असल्याने बघून शिक्षकही आवक झाले आहेत.

याबाबत शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून समज दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारच्या आक्षेपार्ह वस्तू बाळगल्या जात असल्याने पालकांसह समाजातील सर्वच स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. अशा बाबींना आळा घालण्यासाठी पालकांनी जागरूक राहून आप आपल्या पाल्याकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायला हवे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *