संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या उत्पन्नात आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेरीस चौपटीने वाढ. देणगीचे सर्व उच्चाँक मोडीत

संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या उत्पन्नात आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेरीस चौपटीने वाढ. देणगीचे सर्व उच्चाँक मोडीत

संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या नवीन विश्वस्त मंडळाची निवड झाल्यानंतर संस्थांनच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत असून यावेळी आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या उत्पन्नात व नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक होण्याच्या अगोदरचे आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत तब्बल चौपटीने वाढ झालेली आहे. तर मागील वर्षी देखील संस्थांनाच्या उत्पन्नात दुपटीने वाढदिवसाच्या झालेली होती. यावेळी संस्थानने देणगीचे सर्व उच्चाॅंक मोडीत काढले आहेत.

वर्षानुरूप संस्थांनाच्या उत्पन्नात झालेली वाढ येणेप्रमाणे :

१) २०२२-२३ = ₹ १७,७२,५३८/-
२) २०२३-२४ = ₹ ३३,३१,५७१/-
३) २०२४-२५ = ₹ ६७,२४,०१७/-

सदरील २०२४-२५ च्या उत्पन्नात मा. धर्मादाय उप आयुक्त साहेब यांच्या आदेशान्वये केलेल्या फिक्स डिपॉझिटच्या ₹ १४,२७,४९०/- या रक्कमेचा देखील समावेश केलेला आहे.

संस्थानने वेगवेगळ्या माध्यमातून भाविकांमध्ये केलेल्या जनजागृतीमुळे भाविकांचा संस्थानकडे देणगी देण्याचा ओघ वाढलेला आहे. आणि सदरच्या वाढीव उत्पन्नातून भाविकांना विविध सोयी सुविधा पुरवणे संस्थानला सहज शक्य झाले आहे. त्यामुळे भाविकांनी दिलेले दान हे सत्कारणी लागत असून संस्थानवर भाविकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात दाखवलेल्या विश्वासाबद्दल संस्थान सर्व भाविकांचे ऋणी आहे.- ऍड. अक्षय कलंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *