उन्हाच्या तडाख्यात गरजूंना माठ भेट देऊन ‘मायेचा गारवा’ नमस्ते फाउंडेशन कडून शेतमजुरांना मदतीचा हात
नाशिक : उन्हाचा तडाखा वाढतच असल्यानं शेतात काम करणाऱ्या मजुरांसह शेतकरी, गरीब, गरजूंना थंड पाणी मिळणे शक्य होत नाही. उन्हात जीवाची काहीली होत असल्याने या बांधवांना मदत म्हणून नमस्ते फाउंडेशनच्या वतीन माठ भेट देण्यात आले.
आपल्या थोड्याशा सहकार्याने कोणाची तरी तहान भागेल या उद्देशाने नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून ही मदत करण्यात आली. दान करून पुण्य कमवा या उपक्रमांतर्गत शेकडो माठ भेट म्हणून देण्यात आले, जलालपूर या गावात निराधार, गरजू व शेतमजूर कुटुंब यांच्याकरिता ही मदत करण्यात आल्याने शेकडो शेतमजुरांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. तेच समाधान संस्थेच्या सदस्यांच्याही चेहऱ्यावरती दिसून येत होते. महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष स्नेहल देव, महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार, जलालपूर गावातील सामाजिक कार्यकर्ते बाळूभाऊ बडदे, संस्थेचे खजिनदार संदीप देव, आदी उपस्थित होते.
हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवानाशिक प्रतिनिधी/: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण कार्यात समाजातील सर्व जाती- धर्मातील लोकांना सोबत घेवून कार्य…
हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवाविठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचा पहिला वारकरी कसा निवडला जातो? आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची…