लोक वस्तीत सार्वजनिक ठिकाणी अन्नपदार्थ टाकत असल्याने रहिवासी त्रस्त
खरंतर अन्न हे पूर्णब्रह्म आहे आणि अन्नदानासारखे दुसरे पुण्य नाही असे म्हटले जाते. तर अन्न हे देवाचे रूप मानले जाते आणि अन्नाचा आदर करणे ही एक परंपरा व धार्मिक संस्कृती आहे. परंतु, अन्न हे केवळ एक शारीरिक गरज आहे असे समजून काही लोक अन्नाचा अपमान करताना दिसून येत आहे.
गणेश चौक येथील शिव सत्य मित्र मंडळ या चौकात पावसाळी नाल्यावर अनेकदा अन्न फेकलेले दिसून येते यामुळे या परिसरात रोगराई व दुर्गंधी पसरत आहे.
रस्त्यावर, चौकात अन्न फेकल्यामुळे ते पायाखाली येऊन अन्नाचा अपमान होत आहे. या भागातील लोक तसेच रस्त्याने येणार जाणारे लोक घरातील उरलेल्या सूरलेले अन्नपदार्थ या ठिकाणी येऊन टाकत आहे.
कचरा उचलण्यासाठी घंटागाडी प्रत्येक चौकात घरोघरी येत असताना देखील लोक अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी कचरा, अन्नपदार्थ फेकून देत आहे की अतिशय अशोभनी व चुकीची बाब आहे.
“या ठिकाणी सर्रासपणे लोक अन्नपदार्थ फेकत असल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदरची बाब महापालिका अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिलेली असून या ठिकाणी घाण कचरा व अन्नपदार्थ फेकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई व्हावी तसेच या ठिकाणी सूचनाफलक लावण्यात यावा अशी मागणी आम्ही वारंवार करत आहोत”.
कुणाल धात्रक
सामाजिक कार्यकर्ते
“येथे मोठ्या प्रमाणात कचरा साठतोय काही आजू बाजूचे लोक अन्न पदार्थ टाकत असताना त्यांना मनाई केल्यास शिवीगाळ करतात, आम्ही सार्वजनिक ठिकाणी टाकत आहोत ही जागा कुणाच्या बापाची नाही असे उद्धटपणे बोलतात तर काही महाभाग रस्त्यावरून जाताना या ठिकाणी गाडी थांबवून कचऱ्याच्या पिशवी फेकताना दिसतात. या भागात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून अशा लोकांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली पाहिजे”.
प्रतीक आतराम
स्थानिक रहिवाशी