Related Posts
जागतिक महिला दिन का साजरा केला जातो, तसेच नाशिक मधील अनेक उद्योजक महिलांचे संवाद नाशिक बातमीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत
महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा…
पॅन कार्ड २.० क्यूआर कोडमुळे गतिमान व अधिक सुरक्षित
पॅन कार्ड २.० क्यूआर कोडमुळे गतिमान व अधिक सुरक्षित पॅन कार्ड धारकांनी नवीन प्रणालीतील पॅन कार्ड २.० घेणे अधिक लाभदायक – सीए डॉ. दिलीप सातभाई पॅन कार्ड…
राज्यात पावसाचा अंदाज, पावसाचे यलो अलर्ट जारी
राज्यात पावसाचा अंदाज, पावसाचे यलो अलर्ट जारी नाशिकसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा राज्यात उकाडा कायम असून मागील…
शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यातून इतिहास निर्माण केला. त्यांच्या कार्यामुळे भारत देशच नाही तर संपूर्ण जग आज प्रेरणा घेत आहे. त्यांच्या कार्याविषयी मोठमोठया विद्यापीठात आज धडे दिले जाऊन संशोधन केले जात आहे अशा या राज्याच्या जन्मभूमीत आपण जन्मलो याचा आपल्याला सार्थ अभिमान असावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या धैर्या, पराक्रमा आणि दूरदृष्टीने स्वराज्य स्थापन केले. त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली, एक सुसंघटित प्रशासन व्यवस्था निर्माण केली. सर्व जातीधर्माच्या लोकांचा सहभाग असल्याने ते रयतेचे राजे आहेत. मातृत्वाचा आदर, इतर धर्माचा सन्मान तसेच लहान थोर सर्वांचा सन्मान त्यांच्या कार्यातून केल्याने जीवाला जीव देणारे माणसं निर्माण झाली व यातून स्वराज्य निर्माण झाले, अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा पट डॉ. प्रमोदकुमार हिरे यांनी उलगडला.