नितीन डोंगरे यांना महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा ‘बेस्ट फ्रेंड’ पुरस्काराने सन्मानित

नाशिक प्रतिनिधी:/ पुणे येथील महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी समाजातील वेगवेगळ्या स्तरावर विशेष कार्य करत असलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष व वरिष्ट कर सल्लागार नितीन डोंगरे यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा ‘बेस्ट फ्रेंड अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. 

नितीन डोंगरे यांनी विविध संस्थांमध्ये कार्यरत असताना उल्लेखनीय कामकाज करीत त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप उमटवली असून विशेष करून कर सल्लागार असोसिएशनच्या विविध स्तरावरील सेमिनार, कॉन्फरन्स, यासाठी त्यांनी अतुलनीय कार्य केलेले आहे. हे कार्य करताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीशी नाळ जोडत अनेकांना सेवा देत ते कायमच मार्गदर्शन करत आहेत. कर सल्लागारांना दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडी-अडचणी बाबत कायम तत्पर राहत मैत्रीपूर्व नात्याने त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करतात. सर्वांशी मैत्रीपूर्व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करत असतात यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असा ‘बेस्ट फ्रेंड ॲवार्ड” खऱ्या अर्थाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप असल्याचे मत एमटीपीए अध्यक्ष प्रसाद देशपांडे यांनी व्यक्त केले. 

यावेळी नाशिक येथील कर सल्लागार अनिल चव्हाण यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना “कोहिनूर” पुरस्काराने तर सिन्नर येथील नयन निऱ्हाळी यांना “सुपरस्टार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

एमटीपीए चे अध्यक्ष प्रसाद देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना नितीन डोंगरे, समवेत, नवनिर्वाचित अध्यक्ष अनुरुद्र चव्हाण, श्री नलावडे आदी पदाधिकारी

पुरस्काराने कार्य करणाऱ्या व्यक्तीवरील जबाबदारी अधिक प्रमाणात वाढते व अधिक उत्तम कार्य करण्यासाठी उत्तेजित करत असते यामुळे कोणत्याही पुरस्कारामुळे निश्चितच उत्साह वाढून प्रेरणा मिळत असते. हा पुरस्कार केवळ व्यक्तिगत माझा नसून तर उत्तर महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा गौरव आहे व मी सर्व सहकारी मित्र सदस्य यांना तो समर्पित करतो. 

– नितीन डोंगरे (अध्यक्ष, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *