शाळांनी सतर्क व जागरूक राहावे! राज ठाकरे यांचे आवाहन
नाशिक प्रतिनिधी:/ महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा गेल्या काही दिवसांपासून गोंधळ सुरु आहे. महाराष्ट्रात शासनाने शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात होऊ घातलेल्या बदलामुळे या ना त्याकारणावरून वाद निर्माण होत असून काही निर्णय मागे घेण्यात आले असले तरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या राज्य सरकारने शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेचा केलेला समावेशावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही असा इशारा देताना कोणत्या शाळेत हिंदी शिकवलं जातं हेच बघतो असा अलीकडेच दम देखील राज ठाकरेंनी भरला होता.


