मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु केली
नाशिक बातमी न्यूज नेटवर्क:/ मनसेकडून मुंबईत संघटनेत मोठे फेरबदल होणार आहेत. राज ठाकरेंनी केंद्रीय समित्यांना काम न करणाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.
महापालिका निवडणुकी आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती करतील की नाही यासंदर्भात वेगवेगळे अंदाज लावले जात आहे. दोन्ही नेत्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली असली तरी त्यावर अधिकृत भाष्य मात्र केलं नाही.
मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असून, राज ठाकरेंसोबत युती केल्यास जागावाटप कसं करावं याचा तिढा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच आता राज ठाकरेंनी पालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु केली आहे. काम न करणाऱ्यांना थेट पक्षातून काढून टाकण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.
जाहिरात
