मधुकर कड यांची अंबड पोलीस ठाण्यात नियुक्ती – समाजातील विविध मान्यवरांकडून जोरदार स्वागत

मधुकर कड यांची अंबड पोलीस ठाण्यात नियुक्ती – समाजातील विविध मान्यवरांकडून जोरदार स्वागत

सिडको प्रतिनिधी:/ गेल्या काहीं काळापासून अंबड पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची सतत बदली होताना दिसून येत आहे. नवीन सिडकोतील अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी व कायदा सुव्यवस्था मुळे अंबड पोलीस स्टेशन कायमच चर्चेत राहिले आहे. अलीकडच्या काळात सिडकोतील गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढलेले आहे. अशातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हांडे यांच्या जागी मधुकर कड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक मध्ये मधुकर कड यांच्या कामकाजाचा दबदबा असून नाशिककरांना विशेष करून नवीन नाशिक भागातील त्यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांच्या नियुक्तीने नागरिकांनी समाधान व्यक्त केले जात असून गुन्हेगारीला आळा बसून कायदा सुव्यवस्था अबाधित राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचा सर्वसामान्य व्यक्तीपासून ते अनेक वरिष्ठ मान्यवरांशी सलोखाचे संबंध आहेत. गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कायमच तत्पर व कार्यशील अशी त्यांची ओळख असून आजवर अनेक मोठमोठ्या गुन्ह्यांचा शोध लावून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वी त्यांनी नवीन नाशिक मध्ये उच्छाद घालणारी टिप्पर गँगचा नायनाट केला होता.

नवीन सिडको परिसराशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे जुने संबंध असून अनेकाशी त्यांची भावनिक नाळ जोडली गेली आहे. यामुळेच त्यांच्या नियुक्तीची माहिती समोर येताच विविध प्रसार माध्यमांमधून व सोशल मीडिया मधून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होताना दिसत होता; तर दुसरीकडे अंबड पोलीस स्टेशन मध्ये विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांचा पूर्वीचा अंबडचा अनुभव लक्षात घेत आगामी निवडणूक काळात वादंग निर्माण होऊ नये, याकरिता त्यांची पुन्हा अंबडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती केली. त्यांना मानणारा मोठा वर्ग अंबडच्या हद्दीत आहे. यासोबतच सध्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढणारी गुन्हेगारी रोखण्यात त्यांचा अनुभव कामात येईल, यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या नियुक्ती बाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *