सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आषाढी एकादशी साजरी उत्सवात साजरी

अवघी दुमदुमली पंढरी
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित , विद्या प्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यम , इयत्ता १ ली ते ४ थी (प्राथमिक विभाग ) या शाळेत शनिवार दिनांक ५ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. पालखी पूजन तसेच विठ्ठल रखुमाई यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांचे पूजन मुख्याध्यापिका यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी वर आधारित कार्यक्रम बसविला त्यात अभंग,पावली, नृत्य ,आषाढी एकादशीची माहिती सांगण्यात आली . शाळेतील सर्व विद्यार्थी वारकरी वेशात आले होते . हरिनामाच्या गजरात सबंध शाळेचा परिसर अगदी दुमदुमून गेला होता.कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्षा सौ.सुवर्णा दाबक मॅडम तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मेघा वरखेडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *