सामाजिक कार्यकर्ते कैलास (बापु) हिरामण चुंबळे यांचे आवाहन
सिडको प्रतिनिधी:/ शासन आपल्या दारी या माध्यमातून राज्य सरकारने जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना उपक्रम राबवत केवळ आमलबजावणीच नाही तर प्रत्यक्षरित्या लाभ देखील मिळवून दिले आहेत. सिडको वसाहत मध्ये सर्वसाधारण लोक राहत असून आपण सिडकोला कामगार वसाहत म्हणून ओळखले जाते. सिडकोतील प्रत्येक पर्यंत शासनाच्या योजना पोहोचवून त्याचा लाभ व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजित केला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते कैलास (बापु) चुंबळे यांनी दिली.
दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण मंडळ, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार व स्मितहर्ष एज्युकेशन अकॅडमी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सामाजिक कार्यकर्ते कैलास (बापु) हिरामण चुंभळे यांच्या सहकार्याने महिला व पुरुषांसाठी ईश्रम कार्ड, आभा कार्ड, नोकरी विषयक शासकीय पोर्टल वर रजिस्ट्रेशन इ. बाबत, दत्त मंदिर, सावरकर चौक, आदर्श शाळेजवळ, जुने सिडको येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. महिलावर्गाचा कार्यक्रमास भरभरून उस्फुर्त प्रतिसाद बघून भविष्यात असे अनेक कार्यक्रम वेळोवळी जनतेच्या हितासाठी आयोजित करणार असल्याची ग्वाही यावेळी कैलास चुंभळे यांनी दिली.
