विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मोठे योगदान! माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्सहात संपन्न
शाळेच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील बाळासाहेब घुगे यांचे आश्वासन
प्रतिनिधी:/ प्रत्येक जण आपापल्या आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहोत, याचं खरं श्रेय आपल्या शाळेला व शाळेतील शिक्षकांना जातं. शाळेतील शिक्षकांनी आपल्याला योग्य शिक्षण तर दिलंच, पण त्यासोबतच जगण्याची योग्य दिशाही दाखवली यामुळेच आपण आज सामाज्यात चांगले नागरिक म्हणून ओळखले जात आहोत.
हरिभाऊ सांगळे व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घुगे यांच्या पुढाकाराने यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, निमोण येथे सन १९९१-९२ च्या माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्सहात संपन्न झाला. शाळेमध्येच आपल्याला आयुष्याची जडणघडण होत जीवनाचे धडे शिकायला मिळत असतात. शाळेची शिस्त ,संस्कार व शिक्षकांचे मार्गदर्शन कायम डोळ्यासमोर ठेवत आम्ही माजी विद्यार्थी जीवनाची वाटचाल करत असतो. यामुळे आम्ही देखील शाळेचे देणे लागतो. शाळेच्या विकासासाठी आम्ही सर्व माजी विद्यार्थी सातत्याने प्रयत्नशील राहू असे विचार हरिभाऊ सांगळे व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घुगे यांनी विद्यालयात आयोजित कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले.
