वंजारी समाजरत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

वंजारी समाजरत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न 

वंजारी समाजाने संघटित होऊन समाजासाठी कार्य करावेबाळासाहेब घुगे

यशस्वी होण्याचा मूलमंत्र म्हणजे शिक्षण! समाजाने मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज – कोंडाजी मामा आव्हाड

नाशिक/ महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वंजारी समाज विखुरलेला आहे. समाज्याने संघटित होऊन समाजहितासाठी कार्य करत वंजारी समाजाची ओळख केवळ महाराष्ट्रा पुरतीच मर्यादित न राहता सबंध भारतात समाजाचे नाव निघाले पाहिजे असे मत भाजपा उत्तर महाराष्ट दिव्यांग आघाडीचे प्रभारी बाळासाहेब घुगे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र संचालित न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था, वंजारी समाज सेवा प्रतिष्ठान, क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक, वंजारी क्रांती सेना व श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने वंजारी समाजरत्न पुरस्कार २०२५ वितरण प्रसंगी ते बोलत होते.

वंजारी समाजातील व्यक्ती सरकारी व शासकीय क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे तर काही व्यवसाय – उद्योजक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य करणारे तसेच आध्यात्मिक, कीर्तनकार, शास्त्री आहेत यांची समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे यासाठी समाज्याने संघटित होऊन कार्य केले करावे असे असे आवाहन यावेळी बाळासाहेब घुगे यांनी केले.

यावेळी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सबंध महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाची नाशिक ही एकच संस्था असून या संस्थेचा विस्तार होणे आवश्यक आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये व जिल्ह्यांमध्ये संस्थेचे कार्यक्षेत्र निर्माण झाले पाहिजे. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा या पुरवल्या तर वंजारी समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळून यशस्वी होतील. यासाठी समाजातील व्यक्तीने पुढाकार घेऊन शिक्षणासाठी समाजात क्रांती घडवावी आजच्या या आधुनिक काळा टिकायचे असेल तर शिक्षण हे एकमेव माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर कोंडाजी मामा आव्हाड, भाजपा शहर अध्यक्ष सुनिल केदार, नाना शिलेदार, मोहन घुगे, बबन खाडे, जगन आप्पा कुटे, बुधजी पानसरे, ह भ प सोपान महाराज शास्त्री, राहुल गणोरे, माधुरी ताई पालवे, डॉ मंजुषा दराडे, विमल आव्हाड, यमुना ताई घुगे, संकेत सानप, रंगनाथ दरगुडे, रोहिदास आव्हाड, डॉ उल्हास कुटे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांनी केले होते. सूत्रसंचालन नंदू सानप सर यांनी केले तर आभार प्रदर्शन बी के नागरे सर यांनी मानले

वंजारी समाजरत्न पुरस्कार – २०२५ यांना यांना प्रदान करण्यात आला

गोविंद भाऊ घुगे – समाजसेवक

१. कांतीलाल सुदामराव बोडके (आदर्श सरपंच – दारणा सांगवी)

२. वसंतराव मुरलीधर धात्रक (आदर्श शिक्षक)

३. लक्ष्मण एकनाथ गोमासे (बांधकाम व्यावसायिक)

४. बी जी घुगे सर (आदर्श मुख्याध्यापक)

५. शिवाजी नबाजी ऊगले (ट्रान्सपोर्ट व्यवसायिक)

६. बाळनाथ देवराम घुगे (आदर्श शिक्षक)

७. विठोबा राजे फडे (राजकीय)

८. सचिन कोंडाजी शेळके (प्रशासन)

९. काशिनाथ बाबुराव मुंढे (आदर्श मुख्याध्यापक)

१०. जगन आप्पा कुंटे (समाजसेवक)

११. डॉ आनंदा सानप (वैद्यकीय, सामाजिक व शैक्षणिक)

१२. ॲड. रमेश काळे, दापुर

१३. भास्कर आव्हाड (कुषी अधिकारी- निफाड)

१४. दता बबनराव सोनवणे (आदर्श सरपंच गोंदे)

१५. किरण नागरे सामान्य प्रशासन

१६. गोरख कारभारी घुगे (देशसेवा)

१७. संदिप बबन नांगरे (राजकीय)

१८. गणपतराव हाडपे (जेष्ठ समाजसेवक)

१९. आदिती प्रकाश गायकवाड (आदर्श समाजसेविका)

२०. नारायण काकड समाज सेवा

२१. योगेश भास्करराव कातकाडे (समाजसेवक, कर सल्लागार)

२२. प्रकाश सानप (युवा उद्योजक)

२३. मारुती मुंडे (दिव्यांग सेवक – उस्मानाबाद)

२४. माणिक घुगे (आदर्श शेतकरी) २५. सुमनताई सोनवणे (समाजसेविका, मा . नगरसेविका)

२६. माणिक घुगे आदर्श शेतकरी

_आदर्श पत्रकारिता_

१. नितीन ढाकणे (दैनिक अतुल्य महाराष्ट्र – परळी वैजनाथ)

२. बाळासाहेब फड (दैनिक सोमेश्वर साथी – परळी वैजनाथ)

३. नरहरी उंबरे (दैनिक पुण्यनगरी – मनमाड)

४. ज्ञानेश्वर प्रकाश आंधळे

५. सचिन सांगळे (दैनिक लोकमत – सिन्नर)

६. विलास माधवराव ढाकणे (दैनिक देशदूत, दिंडोरी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *