नवरात्रोत्सवात वाहतुकीत बदल गडकरी चौक ते मुंबईनाका मार्ग आजपासून बंद

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

नवरात्रोत्सवात वाहतुकीत बदल

गडकरी चौक ते मुंबईनाका मार्ग आजपासून बंद

नाशिक | दि. २२ सप्टेंबर २०२५ :

कालिका देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवसीय यात्रेला आजपासून प्रारंभ झाला आहे. यावेळी होणारी प्रचंड गर्दी व वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण विभागाने महत्त्वाचे बदल केले आहेत. गडकरी चौक ते मुंबईनाका आणि चांडक सर्कल ते संदीप हॉटेल चौफुलीपर्यंतचा मार्ग सोमवारपासून (दि. २२) ते २ ऑक्टोबरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या संदर्भात पोलिस उपायुक्त (वाहतूक) चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचना काढली असून विजयादशमीपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. नागरिकांनी या काळात वाहतूक नियमांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे

गडकरी चौक–मुंबईनाका : सारडा सर्कलमार्गे किंवा एलआयसी–चांडक सर्कल–तुपसाखरे लॉन्समार्गे.

मायको सर्कल–इंदिरानगर बोगदा : तिडके कॉलनी–नंदिनी पूल–आरडी सर्कल–गोविंदनगरमार्गे.

चांडक सर्कल–मुंबईनाका : गडकरी चौक सिग्नल–शिंगाडा तलावमार्गे–द्वारका.

एसटी व सिटी लिंक बसेस : त्र्यंबकनाका सिग्नल–जिल्हा परिषद–खडकाळी सिग्नल–सारडा सर्कल–द्वारका.

मुंबईनाका–मायको सर्कल : बसस्थानक टॅक्सी थांबा–तुपसाखरे लॉन्समार्गे.

अंबड/सातपूर MIDC : द्वारका–गरवारे चौक मार्गे जड वाहने.

पंचवटीकडे जाणारी वाहतूक : द्वारका–कन्नमवार पूलमार्गे.

सारडा सर्कल–त्र्यंबकनाका : कृषी विभाग कार्यालय–एन.डी. पटेल रस्ता–साठे चौकमार्गे.

नवरात्रोत्सव काळात शहरात येणाऱ्या भाविकांनी आणि वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या या मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

जाहिरात

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *